(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा खेडची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. खेड क्रमांक १ शाळेत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राजेंद्र चांदीवडे होते, तर शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर यांनी निवड प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
नूतन कार्यकारिणीत संतोष जाधव यांची तालुका नेतेपदी, एकनाथ पाटील यांची अध्यक्षपदी, संजय जाधव यांची सचिवपदी, अनिल साळुंखे यांची कार्याध्यक्षपदी, मारुती पाटील यांची कोषाध्यक्षपदी, तर सागर धप्पाधुळे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र चांदीवडे, माजी कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे आणि माजी कोषाध्यक्ष मंगेश झावरे यांच्यासह निवृत्त कार्यकारिणीच्या सदस्यांचे संघटनेसाठी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानून त्यांचा गौरव करण्यात आला. नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
सभेला अशोक मगदूम, शिरीष भालेकर, कृष्णा गंभीरे, अरविंद भागणे, अण्णासाहेब पाटील, प्रमोद म्हादे, बाजीराव पाटील, विनायक पडवळ, संदीप घाणेकर, लक्ष्मण कोळी, विजय सकपाळ, रवींद्र पाबे, गणोजी माने, प्रवीण कांबळे, विनोद यादव, आशिष उतेकर, संदीप साबळे, सचिन गमरे, राहुल तुगावकर, दिनेश दळवी, हर्षल तळोकर, शैलेश बहुतुले, शरद कदम, सुभाष बारगुडे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक संघाचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लवकरच शिक्षक संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित कार्यकारिणीने दिली.

