(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विजयकुमार गणपतराव भोसले यांना दुर्गा सोशल फौंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड आदर्श समाजभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे भव्य कार्यक्रमान देवून गौरविण्यात आले.
दुर्गा सोशल फौंडेशन सोलापूर च्या वतीने समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविले जाते. श्री. विजयकुमार भोसले यांनी शैक्षणिक क्षेत्रात, क्रिडा व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून त्यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार ऍंट्रिया हॉल स्टेशन रोड, ताराबाई पार्क जवळ कोल्हापूर येथिल भव्य कार्यक्रमात गौरविण्यात आले.
यावेळी उद्योजक विजयकुमार भोसले यांनी गोरगरीबांना, विद्यार्थांना शिक्षणासाठी केलेली मदत, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्षा डॉ. पदमजा खटावकर, कार्यक्रमाचे संयोजक विक्रम बसवंत शिंगाडे यांनी यावेळी सांगितले. श्री. भोसले हे मुंबईतील अनेक स्थानिक मंडळाचे सल्लागार व छ. शिवाजी महाराज हायस्कूल खोपी (मुंबई) चे माजी अध्यक्ष आहोत. श्री विजयकुमार भोसले यांच्यावर खेड व मुंबई येथून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.