(खेड)
खेड तालुका कुणबी कर्मचारी संघातर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे उत्साहात संपन्न झाला. संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट व शमिका म्हादे, नगरसेविका दीप्ती शिगवण व स्वप्नाली चव्हाण, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर व शांताराम म्हसकर, कुणबी ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी, माजी आमदार तु. बा. कदम यांचे सुपुत्र अमित कदम, भरणेचे सरपंच संतोष गोवळकर, चिंचवलीचे सरपंच गणेश कांदेकर, कुणबी युवा संघटनेचे सूरज जोगळे, माजी अध्यक्ष विलास धामणे, माजी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, ओबीसी अध्यक्ष दीपक शिगवण, जिजाऊ संघटनेचे संदीप पाटील, अजगणीच्या सरपंच संजना बुरटे, कुणबी युवा संघटनेचे सचिव मच्छिंद्रनाथ मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात समाजातील सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल राजेश भागणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर साखरोली-मोरेवाडी येथील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ठोंबरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे आणि जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे यांनी खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, सल्लागार विलास धामणे, उपाध्यक्ष निलेश कांदेकर, तुकाराम काताळे, शरद कदम, प्रमोद म्हादे, कोषाध्यक्ष संदीप घाणेकर, नवनीत घडशी, संजय जाधव, राजेश भागणे, रविंद्र पाबे, भागोजी कडव, प्रशांत आंबेडे, संदीप फागे, संतोष तांबट, अंकुश भानसे, मनोहर मनवळ, रवींद्र जोगळे, सचिन जड्याळ, लक्ष्मण बाईत, चंद्रकांत रेवाळे, लक्ष्मण खाडे, महेश पवार, पूजा कोदारे, सिद्धी जाधव, रसिका रेवाळे, विद्या घडशी आणि ऋतुजा तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

