( चिपळूण )
मारुती सुझुकीच्या प्रीमियम नेक्सा वाहनांची श्रेणी चिपळूणकरांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागृत मोटर्स प्रा. लि. यांच्या वतीने नेक्सा LTE (Long Term Event) आउटलेटचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.
या आउटलेटचे उद्घाटन चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे आणि नगरसेवक कपिल शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी जागृत मोटर्स प्रा. लि.चे संचालक राजेंद्र जोशी व रेश्मा जोशी प्रमुख उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला ग्राहक आणि वाहनप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना संचालक राजेंद्र जोशी यांनी जागृत मोटर्सच्या स्थापनेपासूनचा प्रवास आणि मारुती सुझुकीची अधिकृत डिलरशिप मिळवितानाचे अनुभव सांगितले. आजवर एक लाखांहून अधिक ग्राहकांनी जागृत मोटर्सवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चिपळूणमधील ग्राहकांना मारुती सुझुकीच्या प्रीमियम नेक्सा वाहनांचा दर्जेदार अनुभव मिळावा, या उद्देशाने हे आउटलेट सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या मनोगतात चिपळूणकरांसाठी प्रीमियम वाहनांची सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जागृत मोटर्सची सेवा आणि गुणवत्तापूर्ण ग्राहकाभिमुख कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मारुती सुझुकी ही जागतिक स्तरावरील विश्वासार्ह वाहन उत्पादक कंपनी असून तिची वाहने आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरतात, असे सांगत नव्या आउटलेटला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत संचालक राजेंद्र जोशी आणि रेश्मा जोशी यांनी केले. सूत्रसंचालन राजेश जोष्टे यांनी केले.
यावेळी जागृत मोटर्सचे जनरल मॅनेजर अतुल जाधव, चिपळूण शाखा व्यवस्थापक प्रसाद चितळे, नेक्सा प्रतिनिधी दिग्देश राजेशिर्के तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी ग्राहकांनी नेक्सा LTE आउटलेट, मुंबई-गोवा महामार्ग, सिंचन कार्यालयासमोर, कापसाळ, चिपळूण येथे संपर्क साधावा, असे आवाहन जागृत मोटर्स प्रा. लि.च्या वतीने करण्यात आले.

