(जाकादेवी / वार्ताहर)
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, करबुडे मूळगाव येथील विद्यार्थीनी कु. तनिष्का सुशील तांबे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तनिष्का तांबे हिने तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीत १६ वे, तर जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत १०९ वे स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशासाठी तनिष्काला वर्गशिक्षिका सौ. वृषाली राऊत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. दत्ताराम मुंडेकर, श्री. शैलेश शिंदे, श्री. प्रशांत दुडये, मुख्याध्यापक श्री. वळवी, श्री. जामसूतकर, सौ. गिम्हवणेकर आणि श्री. कळंबटे यांनीही तिला मोलाचे मार्गदर्शन केले.
तनिष्काच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, गावकरी तसेच करबुडे केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष मोहिते आणि केंद्रातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

