(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली (मराठवाडी) येथील जयश्री चंद्रकांत चाळके यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.
जयश्री चाळके या चाफवली गावातील एक प्रेमळ, सुस्वभावी व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या.
कै. चंदूशेठ चाळके यांच्या त्या पत्नी होत. गावातील गरजू व गोरगरीबांना त्या नेहमीच मायेची साथ देत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, आपुलकीने विचारपूस करण्याच्या सवयीमुळे आणि आदरातिथ्यामुळे त्यांनी परिसरातील अनेकांची मने जिंकली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चाफवली परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा दशक्रिया विधी आज, शुक्रवार दि. २६ जून रोजी चाफवली येथे होणार असून बाराव्या दिवसाचा विधी रविवार, दि. २८ जून रोजी चाफवली येथे संपन्न होणार आहे.

