(रत्नागिरी/ संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील रहिवासी मनोज सखाराम आंबवकर (वय ५०) हे २२ जूनपासून बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मनोज आंबवकर हे २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.५४ वाजण्याच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द, पालशेतकरवाडी येथून अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन :
नाव: मनोज सखाराम आंबवकर
वय: ५० वर्षे
पत्ता: रा. माखजन सरंद, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
उंची: ६ फूट
रंग व बांधा: गोरा रंग, सडपातळ बांधा
चेहरा: उभट
नाक: सरळ
केस: काळे
पोशाख: निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट
पायात: चॉकलेटी रंगाची चप्पल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जवळ मोबाईल असून त्याचा क्रमांक ८७६७१२९५९८ आहे.
नागरिकांना आवाहन
वरील वर्णनाशी मिळती-जुळती व्यक्ती कुठेही आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा ८७६७१२९५९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

