(रत्नागिरी)
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीअंतर्गत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी जुईली महेंद्र दळवी यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
या मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी ३० मे रोजी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी आज संबंधित अर्ज मागे घेतला.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवार, ४ जूनपर्यंत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

