(रत्नागिरी)
करबुडे गावासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी शाखा रत्नागिरी शाखेकडून करबुडे गावासाठी एलआयसीचा मानाचा बिमाग्राम पुरस्कार व 100000/- रुपये रोख स्वरूपाचे पारितोषिक ग्रामपंचायत करबुडे येथे प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला एलआयसी रत्नागिरी शाखा प्रबंधक सौ. माळवणकर मॅडम, विकास अधिकारी श्री चंद्रशेखर पटवर्धन व करबुडे गावचे विमा प्रतिनिधी श्री. वैभव धनावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी करबुडे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. संस्कृती पाचकुडे मॅडम व उपसरपंच कु. करिष्मा गोताड मॅडम, ग्रामपंचायत सदस्य व करबुडे गावचे गावकर, पदाधिकारी, माजी सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बिमाग्राम करण्यासाठी गावचे सुपुत्र व एलआयसीचे विमा सल्लागार श्री. वैभव सदानंद धनावडे यांनी त्यासाठी पाठपुरावा करून सरपंच, उपसरपंच तसेच ग्रा.सदस्य यांच्या सहकार्याने करबुडे गावाला पहिलाच पुरस्कार मिळवण्यात यश प्राप्त करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच श्री. सुनील खापरे यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व एलआयसी विषयी कृतज्ञता व्यक्त करून गाव विकासासाठी एलआयसीच्या सहकार्यासाठी गावातून सदैव प्रयत्न होत राहतील असे अपेक्षा ठेवून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

