(दापोली)
जागरण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने येत्या रविवारी, २४ मे २०२६ रोजी दापोली येथे ‘रंगधारा कवी संमेलन’ आणि ‘पंडित खावर पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ३ वाजता दापोलीतील नर्सरी रोड येथील पद्मश्रद्धा हॉलमध्ये संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन व अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व जयवंत जालगांवकर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमासाठी ‘आनंद प्लस’चे विशेष सहकार्य लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष मंगेश मोरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संस्थेचे कार्य जालगवे (ता. दापोली) येथील दत्तनगर परिसरातून चालवले जाते.
साहित्य, कविता आणि सामाजिक क्षेत्राशी निगडित या कार्यक्रमास परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक, अभ्यासक आणि लेखकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

