(दापोली)
यशतेज फाऊंडेशन मंडणगड आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दापोली तालुक्यातील विपुल क्रांतिदूत फडके याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गेली तीन वर्ष तो विनायकमाने सर यांच्याकडे बुद्धिबळाचे धडे घेत आहे. ८ ते १६ या वयोगटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विपूलने आपल्या बुद्धीची चमक दाखवली आहे. या आधी देखील विपुलने बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले आहे. विपूलच्या या यशाबद्दल दापोली तालुक्यातून त्याचे कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

