(रत्नागिरी / वार्ताहर)
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग आणि राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रत्नदुर्ग येथे भव्य स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता रत्नदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजा (हनुमान मंदिर) परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या मोहिमेत इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
किल्ल्याच्या परिसरातील स्वच्छता, झाडाझुडपांची साफसफाई तसेच संवर्धनाशी संबंधित विविध कामे या मोहिमेत केली जाणार आहेत. मोहिमेला उपस्थित राहताना प्रत्येक मावळ्याने संवर्धनासाठी आवश्यक साधने व हत्यारे सोबत आणावीत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी ९९२०९०५९२०, ७६६६७०८२०१ किंवा ८५९१५६८३७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

