(रत्नागिरी)
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथील शेतकरी काशिनाथ बापट यांच्या शेतात चारसुत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात सीआरए तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फळबाग लागवडीचेही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, तंत्र अधिकारी प्रमोद पाटील, श्रीमती काळे, मंडळ कृषी अधिकारी श्री. मासाळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.