( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यात आयोजित करण्यात आलेली बुद्धिस्ट प्रीमियर लीग (BPL) २०२६ ही क्रिकेट स्पर्धा उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडली.
स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदवून चुरशीची लढत रंगवली.
मैदानाची उत्तम व्यवस्था, वेळेचे काटेकोर पालन तसेच खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि आकर्षक ठरली. प्रत्येक सामना रोमांचक झाल्याने प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक: संघ स्ट्रायकर्स (मालक: दैवत पवार)
द्वितीय क्रमांक: समर-११ (मालक: चैताली जाधव)
तृतीय क्रमांक: भीमज्योत वॉरियर्स (मालक: विक्की कांबळे)
चतुर्थ क्रमांक: रॉयल उमरे (मालक: राजेंद्र मोहिते)
बक्षिसे व चषक :
प्रथम: ₹२०,००० + चषक
द्वितीय: ₹१५,००० + चषक
तृतीय: ₹८,००० + चषक
चतुर्थ: ₹७,००० + चषक
वैयक्तिक पुरस्कार :
सर्वोत्तम फलंदाज: अमित शिवगण (समर-११)
सर्वोत्तम गोलंदाज: तन्मय कांबळे ‘बिट्टू’ (संघ स्ट्रायकर्स)
मालिकावीर: अनिकेत पवार (संघ स्ट्रायकर्स)
स्पर्धेच्या यशामागे आयोजक जित पवार, सूरज जाधव, दिनेश जाधव, शेखर कांबळे, विजय तांबे, संघपाल तांबे, अमोल कांबळे, रुपेश जाधव, दीपक शिवगण आणि प्रज्योत कांबळे यांचे नियोजनबद्ध काम आणि एकजूट महत्त्वाची ठरली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच ही स्पर्धा भव्यदिव्य यशस्वी ठरल्याचे मत खेळाडू व प्रेक्षकांनी व्यक्त केले.

