( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील ग्रामदेवता श्री देवी कालेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार, दि. ६ मे ते शुक्रवार, दि. ८ मे २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे. तीन दिवस चालणारा हा धार्मिक सोहळा श्रीदेवी कालेश्वरी–रवळनाथ मंदिर ट्रस्ट, देवळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
बुधवार, ६ मे :
सायं. ४.३० ते ६.३० – देवळे वाणीवाडी ते काळेश्वरी मंदिर मूर्ती मिरवणूक
रात्री ८.०० ते १०.०० – महाप्रसाद
गुरुवार, ७ मे :
सकाळी ८.३० ते दुपारी १.०० – होम, हवन व मंत्रजागर
दुपारी १.०० ते ३.०० – महाप्रसाद
रात्री ८.१० – स्थानिक भजन कार्यक्रम
शुक्रवार, ८ मे :
सकाळी ८.३० ते दुपारी १.०० – मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक विधी
दुपारी १.०० ते ३.०० – महाप्रसाद
दुपारी ३.०० ते ५.०० – हळदी-कुंकू कार्यक्रम
सायं. ५.०० ते ९.०० – स्थानिक भजने
रात्री ९.०० ते १०.०० – ऋणनिर्देश कार्यक्रम
रात्री १०.०० – श्रीदेवी कालेश्वरी नाट्य नमन मंडळ, मढाळ (ता. गुहागर) यांचा नमनाचा कार्यक्रम
या सोहळ्याचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष गजानन काळोखे, उपाध्यक्ष उमेश शेट्ये, सचिव यशवंत घागरे, खजिनदार दीपक गुरव तसेच सर्व सदस्य, ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.

