(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा होणार असून, सकाळी ९ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता कीर्तनकार श्रीनिवास गजानन नाटेकर (रत्नागिरी) यांचे कीर्तन होईल.
दुपारी १२.३० वाजता पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार असून, दुपारी १ वाजता आरती होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

