(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा दि. २९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिरामध्ये पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी पालीतील मुख्य मंदिरात राज्यासह देशविदेशातील भाविक हजेरी लावून, श्रींची सेवा करीत असतात.
उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याची नियोजन सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, मानकरी गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गुरुदास धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षीचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा चैत्र शु.११ ते चैत्र वद्य १ शके १९४८ दि.२९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत संपन्न होणार असून चैत्रोत्सवाची सेवा समस्त सतीश नवाथे, अंबरनाथ हे करीत आहेत.
उत्सव काळात दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वैयक्तिक पुजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदि धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत नैवेद्य, आरती व मंत्रपुष्प, दुपारी १ ते २.३० वा.पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७.३० वा.पर्यंत रूपे लावणे व धुपारती व रात्री ८ ते ९ वा.पर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप,रात्री ९ ते ९.३० वा. प्रसाद असे नित्य कार्यक्रम होतील.
चैत्रउत्सवात रविवार २९ मार्च रोजी रात्रौ ९.३० ते १०.३० वा.पर्यंत मंत्रजागर,१०.३० ते १२ वा.पर्यंत कीर्तन,१२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना,सोमवार ३० मार्च रोजी रात्रौ ९ ते १० वा. पर्यंत स्थानिक भजन,१० ते १२ वा. कीर्तन, कीर्तनकार ह.भ.प.अमृता नवाथे, जावडे,लांजा,१२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना, मंगळवार ३१ मार्च रोजी सायं. ६.४५ वा.दीपोत्सव कार्यक्रम,रात्रौ ९ ते १०.३० वा.घरामध्ये वास्तुशास्त्र कसे वापरावे सादरकर्ते श्री नाटेकर, पुणे. रात्रौ १०.३० ते १२ वा. कीर्तन १२.वा.नंतर पालखी प्रदक्षिणा व छबिना.
बुधवार १ एप्रिल रात्रौ ९ ते १०:३० भजन श्री विश्वकर्मा भजन मंडळ,आंबव सुतारवाडी, बुवा- नंदकुमार पांचाळ, रात्रौ १०.३० ते१२ वा. पर्यंत कीर्तन, १२ वा.नंतर पालखी प्रदक्षिणा व छबिना,गुरुवार २एप्रिल रोजी रात्रौ ९.३० ते १०.३० वा. पर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप,१० ३० ते १ वा.पर्यंत स्वरनिहाली, अभंग व नाट्यसंगीत सादरकर्ते निहाली गद्रे ठाकूर, गोवा, रात्रौ १ ते ३.३० वा. पर्यंत पालखी प्रदक्षिणा व छबिना, पहाटे ४ वा. लळीताचे कीर्तन कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथबुवा भाट्ये उमरे,रत्नागिरी.शुक्रवार ३ एप्रिल रोजी
रात्रौ ९ वा.श्री लक्ष्मीपल्लिनाथ नाट्यमंडळ,पाली निर्मित अनिल काकडे लिखित दोन अंकी नाटक फायनल डिसीजन चा प्रयोग होईल.
सर्व भक्तांनी चैत्रोत्सव पर्वात मंदिरामध्ये येऊन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.

