(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयगड बंदरात उभे असलेले ‘एलपीजी आमिर गॅस’ (IMO No. 9167409) हे जहाज जप्त करण्यात आले आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने 29 एप्रिल 2026 रोजी हा आदेश दिला.
प्रकरणातील फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने जहाजावर असलेला ‘LPG (mix) in bulk’ माल उतरवण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच जहाज सध्या Jaigad Port येथेच थांबवून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, JSW Jaigad Port Ltd यांना जहाजाला बाहेर जाण्यास परवानगी (Outward Port Clearance) देऊ नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याशिवाय, जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये आणि त्यावरील माल उतरवला जाऊ नये, याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आवाहन सर्व संबंधित पक्षांना करण्यात आले असून, या प्रकरणाकडे बंदर प्रशासन आणि संबंधित विभागांचे लक्ष लागले आहे.

