(रत्नागिरी)
युवतींना स्वसंरक्षणाचे कौशल्य देत त्यांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्यावतीने विशेष ‘शौर्य प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत असताना, अशा उपक्रमांना विशेष गरज निर्माण झाली आहे.
हे शिबिर १० मे ते २० मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
स्थळ : श्री अनिल मांडवकर यांचे निवासस्थान, लोळगेवाडी, ओणी,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
या शिबिरात सहभागी होणाऱ्या युवतींना लाठी-काठी युद्धकला, दंडसाखळी तंत्र तसेच मार्शल आर्ट्सचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधान विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
“आजच्या काळात प्रत्येक युवतीने स्वसंरक्षणासाठी सज्ज असणे गरजेचे आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले. शिबिरासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून जागा मर्यादित आहेत. त्यामुळे इच्छुक युवतींनी लवकर नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

