(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे ग्राम शाखेचे धडाडीचे माजी अध्यक्ष, निवृत्त भारतीय आर्मी सैनिक (हवालदार) सन १९७१ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धातील महार बटालियन मधील योद्धा रामचंद्र देमा सावंत यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आर्मी माजी सैनिक रामचंद्र देवा सावंत यांनी देश सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धामध्ये त्यांची कामगिरी अनमोल ठरली. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक व्याख्यानातून देशभक्तीचा अंगीकार फुलवला होता. माजी सैनिक रामचंद्र देमा सावंत यांची अंत्ययात्रा कोळीसरे येथे आज (शुक्रवारी २६) रोजी सायंकाळी सहा वाजता निघणार आहे. माजी सैनिक रामचंद्र सावंत यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी तालुक्यासह विविध सामाजिक, धार्मिक संघटना, भारतीय सैनिक दलाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

