भविष्यवाण्यांमुळे जगभरात चर्चेत असलेल्या बाबा वेंगा यांची भाकिते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहेत. २०२६ हे वर्ष काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते, तर काही राशींच्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आणि आर्थिक लाभाचे संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्रात म्हटले जात आहे. बाबा वेंगा यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भविष्यवाण्यांनुसार, वर्षअखेरीपर्यंत चार राशींच्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिक आयुष्यातील निर्णय, कौटुंबिक संबंध, स्वभाव आणि आरोग्य या बाबतीत या राशींच्या व्यक्तींनी अधिक सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कुंभ रास
बाबा वेंगा यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या भविष्यवाण्यांनुसार, २०२६ च्या उर्वरित काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करू नये. विशेषतः वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. इतरांना दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील का, याचा विचार करूनच ती द्यावीत. कोणालाही खोटी आश्वासने देणे टाळावे. याशिवाय, भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आपल्या वागणुकीत आवश्यक बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवणे या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे ठरू शकते.
धनु रास
धनु राशीच्या व्यक्तींनी आगामी काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाईगडबड करू नये, असा इशारा बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांमध्ये देण्यात आला आहे. भावनेच्या भरात किंवा पुरेसा विचार न करता घेतलेले निर्णय वैयक्तिक तसेच कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणतीही कृती करण्यापूर्वी तिच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. विशेषतः इतरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. शब्द आणि कृती यामध्ये तफावत राहणार नाही, याची काळजी घेतल्यास संभाव्य अडचणी टाळता येऊ शकतात, असे या भविष्यवाणीत नमूद आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या विचारसरणीकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे व्हायरल भविष्यवाणीत म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे आणि सतत इतरांमधील चुका शोधण्याची सवय मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते. अशा स्वभावामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि अनावश्यक विचारांमध्ये अडकून न राहणे महत्त्वाचे ठरेल. यासोबतच आरोग्याच्या बाबतीतही निष्काळजीपणा करू नये. विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष न करता तिच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींनी २०२६ च्या उर्वरित काळात आपल्या रागावर आणि चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे बाबा वेंगा यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितले जाते. छोट्या-छोट्या कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे ठरू शकते. रागाच्या भरात बोललेले शब्द किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यापूर्वी परिस्थिती समजून घेणे आणि विचारपूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल. स्वभावातील चंचलता आणि उतावळेपणा कमी करून शांतपणे निर्णय घेण्यावर भर देण्याचा सल्ला या राशीच्या व्यक्तींना देण्यात आला आहे.
दरम्यान, बाबा वेंगा यांच्या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या या भविष्यवाण्यांनुसार चार राशींना वर्षअखेरीपर्यंत अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, या भविष्यवाण्यांकडे ज्योतिषशास्त्रावर आधारित माहिती म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)


