(गणपतीपुळे / वैभव पवार)
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील जी.एम्.शेटये हायस्कूल बसणी च्या एकूण सात खेळाडूंची फिटा व कंपाऊंड या प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५,बसणी या शाखेचे माजी सचिव योगेश यशवंत कदम यांची कन्या समृध्दी योगेश कदम हिने वयोगट १९ वर्षे आतील मुली, फिटा या प्रकारात प्रथम क्रमांक व मुलगा शार्दूल योगेश कदम याने १४ वर्षे आतील मुलगे, कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच याच शाखेतील सदस्य विक्रम कृष्णा कदम यांचा मुलगा शर्विन विक्रम कदम यांने १७ वर्षे आतील मुलगे फिटा या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.
त्याचबरोबर या शाळेतील आर्यन विलास चौगुले यांने १९ वर्षे आतील मुलगे, कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक, राधिका राजन सुर्वे हिने १७ वर्षे आतील मुली कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक, साक्षी अरूण घुमे हिने १४ वर्षे आतील मुली, फिटा या प्रकारात तृतीय क्रमांक, आणि अगदी नाजुक व छोटी स्पर्धक श्रावणी नितीन घोसाळकर हिने १४ वर्षे आतील कंपाऊंड या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून हायस्कूलचे नांव उज्वल केले आहे.
या सर्व प्राविण्यप्राप्त स्पर्धकाना क्रीडा शिक्षक नवनाथ जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धकांना शाळेचे मुख्याध्यापक नाईक यांची मोलाचे प्रोत्साहन लाभले. या धवल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे, क्रीडा शिक्षक जाधव, मुख्याध्यापक नाईक व शाखेतील सर्व शिक्षक यांचे बसणी गावातून विशेष अभिनंदन होत आहे.

