(दापोली)
दापोली आगारातून दापोली–लातूर ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस दररोज दापोली बस स्थानकातून सायंकाळी ४ वाजता सुटणार असून लातूरहूनही सायंकाळी ४ वाजता दापोलीकडे प्रस्थान करणार आहे.
ही बस खेड, चिपळूण, कोयना, पाटण, कराड, पंढरपूर, सोलापूर आणि तुळजापूर मार्गे लातूरला पोहोचणार आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून कोकणातून मराठवाड्याकडे प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दापोली आगारातर्फे करण्यात आले आहे.

