(दापोली)
दापोली–बोरिवली ई-बस आणि समोरून येणाऱ्या कारमध्ये आज सकाळी केळवत गावाजवळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोलीहून सकाळी ६ वाजता सुटलेली बस केळवत गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घाटातील वळणावरून जात असताना समोरून येणाऱ्या (क्र. ६५०९) खासगी कारची धडक बसला. हा अपघात सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास घडला.
धडकेत बसच्या पुढील उजव्या टायरच्या मागील भागास आणि कारच्या पुढील उजव्या बाजूस धक्का बसला. या अपघातात बसचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद नसल्याने मोठा अनर्थ टळला.

