(राजापूर )
श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळ, आजीवली (ता. राजापूर) यांच्या वतीने श्री गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ५ व ६ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी दोन दिवसांची आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी सज्ज करण्यात आली आहे. मंडळ गेल्या २१ वर्षांपासून वर्धापन दिनानिमित्त सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, यंदाही भक्तांच्या सेवेसाठी उत्साहाने तयारी करण्यात आली आहे.
५ मे रोजीचे कार्यक्रम: सकाळी ९ वाजता महागणेश यज्ञ, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी ८ वाजता नामांकित दशावतार नाटक सादर होणार आहे. रात्री ११ वाजता पारंपरिक पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
६ मे रोजीचे कार्यक्रम: सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ८ वाजता पारंपरिक ढोल वादन स्पर्धा आणि रात्री ११ वाजता लावणी लोकनृत्य स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धांसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत:
प्रथम क्रमांक – रु. ११,००० व चषक
द्वितीय क्रमांक – रु. ६,०००
तृतीय क्रमांक – रु. ४,०००
पालखी नृत्य, ढोल वादन आणि लावणी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संघांनी व कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत. प्रथम येणाऱ्या १५ स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच प्रसाद व महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: श्री गणेश मंदिर, कोठारवाडी, आजीवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. अधिक माहितीसाठी संपर्क: चेतन राणे – 7045749928, निलेश राणे – 9403260408
गणेश भक्त आणि कला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

