(देवरुख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवून गाडीतून उतवत चाकुचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याप्रकरणातील फरार आरोपींपैकी देवरुख पोलिसांनी दोन आरोपींना आज जेरबंद केले असून एक जण फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे
देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.४७/२०२६ भा.न्या. संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९ (४),३१० (१),२०४, ११२, १४०, (२), १२७(२),११५ (२), ३५१(४) अन्वये दि.०९/०४/२०२६ रोजी ८ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उदय झावरे, पोलीस निरिक्षक, देवरुख यांनी तपास पथके तयार करुन काल गुन्ह्यातील पाच संशयित १)फरहान रशिद मुल्ला वय ४२, रा. कोकण नगर ता.जि.रत्नागिरी, २) प्रथमेश सचिन भाटकर, रा. गोळप ता.जि.रत्नागिरी,वय २४ ३) सर्वेश सुभाष किर वय २२ रा. सोमेश्वर किरबाग ता.जि.रत्नागिरी., ४) धर्मलिंगम विजयकुमार नाडर, वय-२६ वर्षे रा.कुवारबांव रत्नागिरी, ५) भुषण बिपेंद्र सावंत, वय-२६ वर्षे, रा. मि-या भारतीय शिपीयार्ड जवळ ता.जि.रत्नागिरी. अश्या एकुण ०५ आरोपींना काल तात्काळ अटक केलेली होती. सर्व पाच आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उर्वरीत तीन फरार आरोपींपैकीआज दोन आरोपी 1)अरबाज मजीद बांगी वय 31, रा.मजगांव,रत्नागिरी, 2) शार्दूल सुनील किर वय 24 वर्ष, रा. सोमेश्वर, रत्नागिरी. अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नितीन बगाटे पोलीस अधिक्षक रत्नागिरी, बी.बी.महामुनी अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश भट कदम यांचे मार्गदर्शनाखाली उदय झावरे, पोलीस निरिक्षक, पोउनि प्रमोद वाघाटे. शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे या पथकाने ही कामगिरी केली आहे.

