(संगमेश्वर)
तालुक्यातील माखजन येथील माखजन इंग्लिश स्कूल व ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डेरवण येथे झालेल्या विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे तर्फे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटना ताच्या सहकार्याने डेरवण येथे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सॉफ्ट टेनिस मध्ये १७ वर्षे वयोगटात आरुष पवार द्वितीय,तन्मय कवळकर तृतीय तर १९ वर्षे वयोगटात ओंकार दहिवलकर प्रथम, वेदांत लांबे तृतीय, पार्थ माने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक क्रांती म्हैसकर,निखिल वारके, प्रा अभिजित सुर्वे,सचिन कदम आदीनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे व अन्य संचालक, मुख्याध्यापक महादेव परब, पर्यवेक्षक अंबादास घाडगे,व पालकानी अभिनंदन केले आहे.

