(संगमेश्वर / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेत रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार, दि. 31) रोजी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश नारायण भरणकर (वय 42, रा. रेवाळेवाडी, ता. संगमेश्वर) यांनी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास बावनदी येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेतली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी क्षणार्धात नदीत उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शोधमोहीम सुरू असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण असून, घटनेची माहिती मिळताच बावनदी पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात

