(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके यांचा चाफवली येथे विविध संस्थांच्या व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
चाफवली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच चाफवली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसेवक माईन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. चाफवली बौद्धवाडी येथील मुंबई मंडळानेही त्यांचा विशेष सन्मान केला. याशिवाय रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनेही चाळके यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना विलास चाळके यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चाफवली ग्रामस्थांनी आजपर्यंत दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही हेच प्रेम कायम राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या सत्कार समारंभाला चाफवली गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

