(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित ‘सकल वारकरी संघटन’ या उपक्रमांतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा रविवारी (१४ डिसेंबर) पाटगाव येथील श्री क्षेत्र स्वयंभू सांब मंदिरात भव्य प्रमाणात पार पडणार आहे. सकाळी ९ ते रात्री ११ या वेळेत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते ९.३० या वेळेत जेष्ठ वारकरी यांच्या हस्ते वीणा व कलशपूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते १२ दरम्यान ह.भ.प. संजय महाराज कांबळे यांच्या व्यासपीठातून ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ३ ते ४ दरम्यान सहविचार सभा, तर ४ ते ५ या वेळेत पाचांबे येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज भुरवणे यांचे प्रवचन होईल. सायं. ५ ते ६.३० या वेळेत सामुदायिक हरिपाठ, तसेच रात्री ७ ते ९ दरम्यान रांगव येथील ह.भ.प. जय महाराज तुळसणकर यांचे हरिकिर्तन आयोजित आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्यास तालुक्यातील वारकरी बांधव व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रमेश बांडागळे यांनी आयोजकांतर्फे केले आहे.

