(खेड)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे खेड तालुक्यातील नेतृत्व तसेच खवटी गावचे सुपुत्र सुनील धोंडू दळवी यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेड व दळवी परिवार, खवटी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे होते. व्यासपीठावर जिल्हा सचिव संतोष पावणे, कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा नेते दिलीप महाडीक, शिक्षण परिषदेचे नेते बळीराम मोरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, अखिलचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, राजापूर संचालक विजय खांडेकर, जिल्हा संचालिका प्रांजली धमापुरकर, दापोली संचालक अशोक मळेकर, संगमेश्वर संचालक रमेश गोताड, रत्नागिरी संचालक चंद्रकांत कोकरे, चिपळूण संचालक अमोल बोभसकर, जिल्हा संचालक अंकुश चांगण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले. माजी चेअरमन सुनील सावंत यांनी दळवी यांच्या ३५ वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा आढावा घेतला. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून दळवी यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. यावेळी दिप्ती यादव यांनी कविता सादर केली.
सत्काराला उत्तर देताना सुनील दळवी यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “या यशामागे शिक्षक समितीच्या प्रत्येक सभासदाचा मोठा वाटा आहे. तुम्ही कधीही हाक दिल्यास २४ तास सेवेसाठी तयार आहे,” असे आश्वासन दिले. खवटी गावाचे संस्कार, खेड तालुक्याचा पाठिंबा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक बांधवांचे सहकार्य यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात दिपक शिंदे यांनी दळवी यांच्या कार्यकाळात शिक्षक पतपेढीची प्रगती दुप्पट वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेला सक्षम नेतृत्व लाभल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले.
हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपाल तांबे, अनिल यादव, नवनीत घडशी, बबन साळवी, श्रीकृष्ण खांडेकर, शैलेश पराडकर, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नरेश ठोंबरे, संतोष यादव, परशुराम पेवेकर, अजित भोसले, शरद शिंदे, संतोष बर्वे, नितीन साळुंखे, अमर चव्हाण, दिनेश पवार, प्रमोद कदम, सुनील पांगुळ, बबन मोरे, नारायण शिरकर, पांडुरंग देवकते, भागोजी कडव, शशिकांत भुवड, सतीश गजमल, राजेश भागणे, भिकू जानकर, संतोष तांबट, विजय कासार, अनंत भागणे, अनिल आंजर्लेकर, सुधाकर बामणे, राजाराम दरेकर, भरत बोडके, सुनील वाघमारे, रविकिरण फुंदे, जीवन कोकणी, अशोक पाटील, प्रभाकर कोळेकर, संतोष मोरे, राहुल जाधव, धोंडूराम मिसाळ, रवींद्र जोगळे, राजाराम फावरे, अनंत मोरे तसेच महिला प्रतिनिधींमध्ये स्वाती यादव, सुविधा सावंत, किरण जानकर, दीक्षिता तांबे, दीप्ती यादव, स्नेहल बामणे, सुजाता चाळके, कल्याणी कासार, लीना हरमळकर, दीपाली पालवे, भारती कालेकर, मीनल कदम, सुनिता होलगे, शुभदा कोलगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

