(खेड)
मुंबई–गोवा महामार्गावरील वेरळ येथील वाशिष्ठी डेअरी परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता दुचाकी अपघात झाला. या अपघातात खेड येथील राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने पुढे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वेरळ येथील हा महामार्गाचा भाग अपघातप्रवण ठरत आहे. या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. वेगमर्यादा, सूचना फलक, तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

