(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन शाळेला ‘स्टँडिंग फॅन’ भेट देण्यात आला.
याच कार्यक्रमात राज्यस्तरीय ‘मंथन सामान्य ज्ञान’ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कुमारी अनन्या अमित मयेकर, कुमारी कृपा कुणाल मयेकर आणि कुमार अनुज अमोल शेट्ये या विद्यार्थ्यांना शिरगांव जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. वैशाली भास्कर झोरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या साक्षी विनोद साळुंखे यांच्या वतीने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष भुवड, सहाय्यक शिक्षिका श्रीमती अमृता काजवे, अंगणवाडी सेविका सौ. राखी भोळे, शाखाप्रमुख श्री. ओंकार सत्यजित (सत्या) वायंगणकर, उपशाखाप्रमुख श्री. अजिंक्य सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सावली मयेकर यांचेही शाळेला सातत्याने सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक श्री. महेश आरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

