(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बदलत्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायाची ओळख ऑनलाइन जगतात प्रभावीपणे निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी रत्नागिरीतील उद्योजकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आराध्या फोटो स्टुडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्था मर्यादित यांच्या मान्यतेने ‘डिजिटल मार्केटिंग’ विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी लक्ष्मीकेशव सभागृह, माळनाका, रत्नागिरी येथे होणार असून, या सत्राचे मार्गदर्शन पुणे येथील प्रख्यात डिजिटल मार्केटिंग तज्ञ श्री. संदीप भागवत करणार आहेत.
या कार्यशाळेत महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑनलाइन ग्राहक मिळविण्याच्या प्रभावी पद्धती, सोशल मीडिया व SEO तंत्रज्ञानाचा वापर, वैयक्तिक व व्यावसायिक ब्रँड बिल्डिंगची धोरणे आणि व्यवसायाची ओळख तसेच पोहोच वाढवण्याचे उपाय. अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. या कार्यशाळेचे वेळापत्रक सकाळी ९ ते संध्याकाळी ४ असे असून, सहभागासाठी ₹ २००० (जेवणासहित) शुल्क ठेवण्यात आले आहे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन अनिकेत जाधव यांनी केले आहे.

