(खेड)
स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार कळंबणी बु. (ता. खेड) ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भगवान दगडू साळुंके यांना प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
या यशाच्या निमित्ताने वाळंजवाडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी साळुंके यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे, शांताराम म्हसकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम येरापले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भरत आयरे, विशाल महाडीक, राजेश आयरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी केले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

