(राजापूर / तुषार पाचलकर)
गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे गावातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाला गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
या प्रसंगी रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना तसेच विविध सार्वजनिक सुविधांच्या उभारणीस प्राधान्य देत अनेक कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा होऊन नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. येत्या काळातही गावाच्या गरजेनुसार आवश्यक त्या योजना राबवून विकासाची गती कायम ठेवली जाईल, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
याचवेळी गावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीएससी सेंटर तसेच बँक ऑफ इंडिया बीसी पॉईंटचे उद्घाटनही आमदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा तसेच बँकिंग सेवा आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असून, वेळ व खर्चाची बचत होणार आहे.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सिद्धली मोरे, केळवली जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, ताम्हाणे पंचायत समिती सदस्य अपेक्षा वाफेलकर, पाचल पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासिये, महिला जिल्हा संघटिका दुर्वा तावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजूभाई कुरूप, तालुका प्रमुख दीपकजी नागले, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा साळवी, विभाग संघटक आत्माराम सुतार, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, उपविभाग प्रमुख उदय राणे, रविंद्र सावंत, जवळेथर सरपंच अंजली मोरे, माजी सरपंच सुरेश, शाखा प्रमुख तुषार धावडे, युवासेना शाखा प्रमुख हितेंद्र सकपाळ, महिला शाखा प्रमुख मंगला धावडे, युवती शाखा प्रमुख सुषमा मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे, संदीप बारस्कर, प्रवीण मोरे, अमोल मोरे, सत्यवान कुवळेकर, विजय कुवळेकर, संजय कांबळे, शंकर मोरे, संजय धावडे, विलास धावडे, शशिकांत पांचाळ, दत्ताराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. उत्साही वातावरण, ग्रामस्थांचा मोठा सहभाग आणि विकासकामांबद्दलचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम जल्लोषात पार पडला.

