( खेड / वार्ताहर )
शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी व्यवस्थापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवलीला प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा केंद्रे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, माजी सभापती अरुण कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, मानसी जगदाळे आणि रेवती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारताना आंबवली गावच्या सरपंच राजश्री यादव, उपसरपंच विजय यादव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्षा सिद्धी यादव, मुख्याध्यापक श्री. खांडेकर तसेच उपशिक्षिका श्रीमती रेवाळे (खांडेकर) उपस्थित होत्या.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबवली गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला.

