(मुंबई/रत्नागिरी)
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक:
- रेल्वे क्र. 01129 (मुंबई CSMT–मडगाव विशेष):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३ एप्रिल (शुक्रवार) आणि ५ एप्रिल (रविवार) रोजी रात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. - रेल्वे क्र. 01130 (मडगाव–मुंबई CSMT विशेष):
मडगाव येथून ३ आणि ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
थांबे आणि सुविधा:
या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत.
गाडीची एकूण रचना २२ डब्यांची असून त्यात—
- २ टियर एसी – १
- ३ टियर एसी – ५
- स्लीपर – १०
- जनरल – ४
- एसएलआर – २
अशा प्रकारचे डबे असतील. या विशेष गाड्यांचे आरक्षण आज २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC Rail Connect आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हनुमान जयंती, गुड फ्रायडे तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढण्याची शक्यता आहे. ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय केली आहे.

