( मुंबई )
Indian Premier League (IPL) 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक बुधवारी (11 मार्च) जाहीर करण्यात आलं. गतविजेत्या Royal Challengers Bengaluru संघाचा Sunrisers Hyderabad विरुद्ध 28 मार्च रोजी सलामीचा सामना होणार आहे. हा सामना M. Chinnaswamy Stadium, Bengaluru येथे खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या ट्रॉफी सेलिब्रेशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर या मैदानावर सामने आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र आता पुन्हा या मैदानाला आयपीएल सामने घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पाच वेळा आयपीएल विजेता Mumbai Indians 29 मार्च रोजी Kolkata Knight Riders विरुद्ध आपली मोहीम सुरू करणार आहे. हा सामना Wankhede Stadium, Mumbai येथे खेळवला जाईल. तर Chennai Super Kings आपला पहिला सामना Rajasthan Royals विरुद्ध 30 मार्च रोजी Guwahati येथे खेळणार आहे.
विशेष म्हणजे या चारही संघांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकला आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सकडे तीन ट्रॉफी आहेत. राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला होता.
पहिल्या टप्प्यात 20 सामने
आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यात एकूण 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात दोन डबलहेडर सामन्यांचा समावेश आहे. उर्वरित सामन्यांच्या तारखा देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर जाहीर केल्या जाणार आहेत. सर्व संध्याकाळचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील, तर डबलहेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.00 वाजता खेळवला जाईल.
IPL 2026: पहिल्या टप्प्यातील सामने
| क्र. | तारीख | सामना | ठिकाण |
|---|---|---|---|
| 1 | 28 मार्च | RCB vs SRH | बेंगळुरू |
| 2 | 29 मार्च | मुंबई इंडियन्स vs KKR | मुंबई |
| 3 | 30 मार्च | राजस्थान रॉयल्स vs CSK | गुवाहाटी |
| 4 | 31 मार्च | पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स | मुल्लानपूर |
| 5 | 1 एप्रिल | लखनऊ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स | लखनऊ |
| 6 | 2 एप्रिल | KKR vs SRH | कोलकाता |
| 7 | 3 एप्रिल | CSK vs पंजाब किंग्स | चेन्नई |
| 8 | 4 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स | दिल्ली |
| 9 | 4 एप्रिल | गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स | अहमदाबाद |
| 10 | 5 एप्रिल | SRH vs लखनऊ सुपर जायंट्स | हैदराबाद |
| 11 | 5 एप्रिल | RCB vs CSK | बेंगळुरू |
| 12 | 6 एप्रिल | KKR vs पंजाब किंग्स | कोलकाता |
| 13 | 7 एप्रिल | राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स | गुवाहाटी |
| 14 | 8 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स | दिल्ली |
| 15 | 9 एप्रिल | KKR vs लखनऊ सुपर जायंट्स | कोलकाता |
| 16 | 10 एप्रिल | राजस्थान रॉयल्स vs RCB | गुवाहाटी |
| 17 | 11 एप्रिल | पंजाब किंग्स vs SRH | मुल्लानपूर |
| 18 | 11 एप्रिल | CSK vs दिल्ली कॅपिटल्स | चेन्नई |
| 19 | 12 एप्रिल | लखनऊ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स | लखनऊ |
| 20 | 12 एप्रिल | मुंबई इंडियन्स vs RCB | मुंबई |

