(संगमेश्वर)
तालुक्यातील पांगरी येथे शिमगोत्सवानिमित्त पांगरी गिरेवाडी येथे दोस्ती 11 यांच्या वतीने आयोजित गावपातळीवरील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत श्री राधा कृष्ण क्रिकेट संघ, धारेखालील वाडी संघाने विजेतेपद मिळविले. गोताड वाडी संघाने उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार तुषार गावडे यांनी मिळविला. सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आदित्य गावडे यांनी मिळविला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार आयुष मूळे यांनी मिळविला.
या गावपातळीवरील क्रिकेट स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण ११ संघांनी सहभाग घेतला. अतिशय मेहनतीने आणि खेळाडूवृत्तीने सामने खेळले. सर्व सामने अत्यंत चुरशीचे व रोमांचक ठरले. प्रेक्षकांच्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात अंतिम सामना श्री राधाकृष्ण संघ धारेखालील वाडी व गोताडवाडी संघात झाला. यात श्री राधाकृष्ण संघ धारेखालीलवाडी यांनी बाजी मारली व स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे आयोजन दोस्ती 11 पांगरी यांनी केले होते. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, आनंददायी आणि यशस्वीरीत्या झाली
या स्पर्धेमुळे गावातील क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून मैत्री, एकता आणि खेळाडूवृत्तीचा सुंदर संदेश देण्यात आला. विजेत्या संघाचे व वैयक्तिक पारितोषिक मिळविलेल्या, सहभागी स्पर्धकांचे सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

