(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद यशवंत जाधव यांना १४ सप्टेंबर रविवारी ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र-राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आयएमएसएमई मंत्रालय भारत सरकार’ ची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठित ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार आयुर्वेद, योग नेचरोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, एक्युपंचर, एक्युप्रेशर अशा विविध आयुष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चिकित्सकांना दिला जातो. या यादीत डॉ. प्रमोद जाधव यांची निवड भारतभरातून झाली.
पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेटर श्रेया बगडे, चिचवडच्या लोकप्रतिनिधी आमदार सी. शैलेश हाहाले, सोबत डॉ. मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाइल्ड वुमन व पूर्व सहायक महानिदेशक, स्वास्थ्य सेवा निर्देशनालय, स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय सल्लागार आईएमए, तसेच टीडीसी आयएमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था प्रमुख, तसेच विशेष अतिथी श्री गणेश एम. साहाय संचालक विस्तार केंद्र-राजकोट व उदयकुमार टीडीसी पीपीडीसी आयएमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण जोशी (राष्ट्रीय सल्लागार आयएमए व माजी उपनिदेशक, स्वास्थ्य सेवा मंत्रालय भारत सरकार) उपस्थित होते. तसेच डॉ. दिशा चळण, प्रज्ञा सावंत, डॉ. राजे शिंदे, डॉ. तेजस म्हात्रे, डॉ. जगन्नाथ यादव, विनोद बोळके, डॉ. राकेश झोळे, डॉ. अश्विन नागरे, डॉ. विजय काळे पाटील, डॉ. फुकने, डॉ. गोमे, डॉ. प्रगती भानुदास परब, डॉ. रावसाहेब घोडेरा, डॉ. शिरष गिळेमा, प्रफुल्ल नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.प्रमोद जाधव यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

