( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशन, मुंबई संलग्न कला संचालनालय (महाराष्ट्र शासन) मान्यता प्राप्त क्रेडार संचलित देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, चित्रकला महाविद्यालय, रत्नागिरी, प्रद्योत आर्ट गॅलरी, रत्नागिरी आणि ओम साई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा २८ एप्रिल२०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धा सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत घेण्यात आली.तसेच डी कॅड चे प्राध्यापक विक्रम परांजपे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्मरणचित्र आणि चित्रकला याबद्दल मार्गदर्शन, प्रात्यक्षिक करून दाखविले. माननीय ज्येष्ठ कला शिक्षक उदय लिंगायत सर आणि कलाशिक्षक चित्रकार निलेश पावसकर सर आणि चित्रकार शुभम वाड्ये यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
वयोगट – पाचवी ते सातवी या लहान गटामध्ये
प्रथम क्रमांक- स्पर्श संकेत लिंगायत,
द्वितीय क्रमांक-श्रेयस सचिन बापट
तृतीय क्रमांक- आदित्य सुजित आलीम
उत्तेजनार्थ प्रथम -प्रांजल प्रशांत सावंत
उत्तेजनार्थ द्वितीय -गौरांग समीर चाळके
तर मोठ्या गटामध्ये – प्रथम क्रमांक- वरद प्रशांत मेस्त्री
द्वितीय क्रमांक – ऋषभ हर्षद कोतवडेकर
तृतीय क्रमांक -ओम हर्षद कोतवडेकर
उत्तेजनार्थ -श्रेया संदीप साखळकर
या विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व कॅम्लिन तर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचेअभिनंदन करण्यात आले.
सोबत देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आणि प्रद्योत आर्ट गॅलरी मधील कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे व्यवस्थापन डी कॅड चे प्राध्यापक अवधूत पोटफोडे, प्रा.विक्रम परांजपे, प्रा.तन्वी सागवेकर, प्रा.सुयोग पेंढारकर, प्रा.प्रवीण हिरवे आणि गॅलरी व्यवस्थापक मयूरी घाणेकर –भाटकर आणि गॅलरी आर्टिस्ट सिद्धांत चव्हाण यांनी पाहिले.