( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील या वर्षीच्या “यूथ गेम्स २०२६”मधील टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात साताऱ्याच्या आरव देशमुख याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून वर्चस्व राखले आहे. तसेच साताऱ्याच्या श्रावणी माईन हिने मुलींच्या १५ वर्षांखालील गटात सुवर्ण व १३ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळविले. तर साताऱ्याच्याच गौरी नाईक हिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात सुवर्ण व १५ वर्षांखालील गटात कांस्यपदक मिळवून या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राखले आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या वर्षा परुळेकर हिने मुलींच्या १५ व १७ वयोगटाखालील गटांमध्ये रौप्यपदक तर कोल्हापूरच्या पुष्पम शहा याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील गटांमध्ये रौप्यपदक पटकावले. मुलींच्या ११ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या श्रेया माईन हिने सुवर्ण, विभा घाडगे हिने रौप्य व अर्णिका काळे हिने कांस्यपदक मिळविले. मुलांच्या ११ वर्षांखालील गटामध्ये शुभंकर जाधव याने सुवर्ण, प्रणव भोसले याने रौप्य व निरंजन पाटील याने कांस्यपदक मिळविले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटामध्ये राजवीर पाटील याने कांस्यपदक मिळविले. मुलींच्या १३ वर्षांखालील गटामध्ये सांगलीच्या आरोही चांदणे हिने सुवर्ण व मुक्ता शेवडे हिने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या गौरी नाईक हिने सुवर्ण व स्वरा भस्मे हिने कांस्यपदक मिळविले आहे. मुलांच्या १७ वर्षांखालील गटामध्ये सिंधुदुर्गच्या लौकिक तळवडेकर याने सुवर्ण, कोल्हापूरच्या वेदांत पुजारी याने रौप्य व कुणाल बारटक्के याने कांस्यपदक मिळविले. तर मुलांच्या १५ वर्षांखालील गटामध्ये राजवीर गायकवाड याने कांस्यपदक पटकावले.
फोटो : टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना गौरविताना फुटबॉल असोसिएशन चे पदाधिकारी संतोष म्हस्के

