(राजापूर / तुषार पाचलकर)
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त ठरावा, या हेतूने श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानतर्फे विशेष ऑनलाइन कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री संजीव शिवाजी सुतार यांच्या पुढाकाराने पार पडला.
ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा क्र. २, पाचल (दिवाळवाडी) येथील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण सात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
स्पर्धेत विजेते पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: कु. स्वरा कृष्णकांत सुतार (५ वी), द्वितीय क्रमांक: कु. मृण्मयी महेश सुतार (१ ली), तृतीय क्रमांक: कु. गार्गी सुनील सुतार (५ वी)
सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि शालेय उपयोगी वस्तू बक्षीसस्वरूपात देण्यात आल्या. तसेच विजेत्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी श्री. विनायक वाडेकर (तळवडे) यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रदान केल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदा शिर्के, शिक्षिका सौ. रेणुका पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णकांत सूर्यकांत सुतार, पालक शामल सुतार, पूजा सुतार, तसेच ग्रामस्थ प्रतिक्षा ढवळे, रवि नारकर, ओंकार नारकर, दादा नारकर, आणि अंगणवाडी मदतनीस नेमन बाई उपस्थित होत्या.
बक्षीस वितरण समारंभ या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. उपक्रमाबद्दल शाळेकडून श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करण्यात आले..

