(रत्नागिरी)
शून्यातून विश्व निर्माण करणारे, व्यापारी, प्रतिथयश शेतकरी, बागायतदार दिगंबर पुरुषोत्तम सोहनी उर्फ अण्णा (वय ९२) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
वयाच्या १४ व्या वर्षी २०० रु. उसने घेऊन मुंबईला जाऊन अण्णांनी कापड दुकानात सेल्समन म्हणून नोकरी सुरू केली, तिथेच व्यवस्थापक झाले. वडिलांच्या निधनामुळे ते गावी परतले आणि वडिलांचे चण्या-कुरमुऱ्यांचे दुकान पुन्हा सुरू केले. त्यानंतर किराणा, स्टेशनरी, स्टील, नळे, सिमेंट, कापड, आयुर्वेदिक औषधे असा व्याप वाढवला. त्यानंतर आंबा, काजू बागा, भातशेती, नारळ, पोफळी लागवड केली. वयाच्या अखेरपर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, तीन सुना, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे.

