(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील शिवडीवाडीमध्ये ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मंदार मधुकर कणेरी (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना १५ जुलै रोजी पहाटे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार, मंदार कणेरी यांची गेल्या वर्षभरापासून मानसिक प्रकृती अस्थिर होती. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. १५ जुलैच्या रात्री त्यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांना खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

