(देवळे / प्रकाश चाळके)
किरबेट येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री देव विठ्ठल-रखुमाई वार्षिक उत्सव सोहळा यंदा शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते सोमवार 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सोहळा श्री देव विठ्ठल‑रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक तसेच क्रीडात्मक कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी ठेवण्यात आली आहे.
उत्सवाचे सविस्तर कार्यक्रम
आज शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ.
शनिवार, 14 फेब्रुवारी 2026
सकाळी 7.30 वाजता श्रींची पूजा-अर्चा व आरती.
10.30 वाजता महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम.
दुपारी 3.30 वाजल्यापासून भजन कार्यक्रम.
रात्री 10.00 वाजता अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण.
रविवार, 15 फेब्रुवारी 2026 (महाशिवरात्र)
सकाळी 7.30 वाजता श्रींची पूजा-अर्चा व रुद्राभिषेक.
9.30 वाजता भव्य दिंडी प्रदक्षिणा.
दुपारी 12.00 वाजता अल्पोपहार.
12.30 वाजता भजन कार्यक्रम (श्री चैतन्य सांप्रदाय, देवडे).
सायंकाळी 5.00 वाजता हरिपाठ.
6.30 वाजता किर्तन.
रात्री 8.30 वाजता पालखी सोहळा.
9.30 वाजता कार्यकर्त्यांचे मनोगत.
10.45 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम नमन (मुरादपूर पातीची बांडागळेवाडी नमन मंडळ, देवरुख).
सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
सकाळी 7.30 वाजता पूजा-अर्चा.
9.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा.
10.45 वाजता हळदी-कुंकू.
11.15 वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा.
दुपारी 1.00 वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसाद.
भाविकांना आवाहन
या चार दिवसांच्या उत्सवात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती किरबेट, किरबेट ग्रामस्थ विकास मंडळ (मुंबई) तसेच श्री देव विठ्ठल-रखुमाई महिला मंडळ, किरबेट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

