( देवरूख / सुरेश सप्रे )
बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या पुणे युनिटतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बँकिंगविषयी जनजागृती करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शवणे, काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल राखण्यास प्रोत्साहन देणे तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
पुणे–कोल्हापूर ते मार्लेश्वर या मार्गावरून निघालेल्या या संदेश रॅलीचा देवरूख येथील आठल्ये–सप्रे महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. रॅली देवरूखमध्ये दाखल होताच शहीद सैनिक स्मारक येथे रत्नागिरी विभागातील बँक कर्मचारी तसेच नागरिकांनी रॅलीत सहभागी झालेल्या बँक अधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

