(देवरुख /सुरेश सप्रे)
रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका, देवरुख यांच्या वतीने स्व. बाळासाहेब पित्रे स्मृती सहावी रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन मानांकन स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सुलभाताई आपटे क्रीडा संकुल, देवरुख येथे होणार आहे.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंना सहभागाची संधी देण्यात आली असून अंडर ११, अंडर १३, अंडर १५, अंडर १७ व अंडर १९ या गटांत बॉईज सिंगल्स, गर्ल्स सिंगल्स तसेच आवश्यक त्या दुहेरी प्रकारांचा समावेश आहे. खुल्या गटात पुरुष व महिला एकेरी, दुहेरी तसेच मिश्र दुहेरी सामने होणार आहेत. याशिवाय ३५ वर्षांवरील, ४० वर्षांवरील आणि ५० वर्षांवरील खेळाडूंसाठीही स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मानांकित खेळाडू सहभागी होणार असून विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे सचिव निलेश भुरवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी बॅस्टचे उपाध्यक्ष दिलीप विंचू, सचिव निलेश भुरवणे, खजिनदार राजेश जागुष्टे, सहखजिनदार अभिषेक अग्रवाल, स्पर्धा प्रमुख अवधूत मेस्त्री तसेच कार्यकारिणी सदस्य रुपाली नलावडे, हरेश पटेल, आणि स्पर्धा समिती सदस्य विक्रांत दर्डे व सोहम प्रभुदेसाई उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी स्पर्धा समिती प्रमुख अवधूत मेस्त्री यांच्यासह अभिषेक अग्रवाल, आशिष प्रभुदेसाई, सोहम प्रभुदेसाई, प्रमोद भालेकर, राजू जागुष्टे, हरेश पटेल, रुपाली नलावडे, वरद शिंदे, विक्रांत दर्डे व विनोद राठोड विशेष मेहनत घेत आहेत.

