(राजापुर)
मुंबई-गोवा महामार्गावर कोंडये पुलावर रविवारी सायंकाळी 4.30 ते 5.00 वाजेच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 ते 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
घटना समजताच राजापुर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, मृत व्यक्तीच्या सोबत कोण होता, आणि अपघात कसा झाला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.
अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागेवरच मृत अवस्थेत आढळला. मृतदेह तातडीने नाना कुवळेकर यांच्या रुग्णवाहिकेमार्फत राजापुर ग्रामीण रुग्णालयात आणला गेला, नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे.
पोलिस या प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि इतर पुरावे तपासत आहेत. घटना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठीही धोकादायक ठरू शकते, अशी प्रशासनाची सूचना आहे.

